'मॉडर्न डेअरी फार्म' अंतर्गत प्रात्यक्षिकासह परिपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणामध्ये गोठ्याची योग्य रचना व उभारणी, आधुनिक यंत्रणेचा वापर, चांगल्या वंशाच्या गायींची निवड व संवर्धन, खाद्य-चारा व औषधे, कमीत कमी मनुष्यबळ व अधिक उत्पादन इत्यादींचे मार्गदर्शन.
        प्रशिक्षणानंतर व्यवसाय सुरू करणेकामी आर्थिक मदत आवश्यक असते. शासनाच्या विविध योजनांतर्गत गाय खरेदी, गोठा उभारणी, मिल्किंग मशीन, चाफकटर, गव्हाण, मूरघास खड्डा इत्यादींसाठीचे अनुदान व बँक नियमाप्रमाणे भांडवल उपलब्ध करण्यास सहाय्य व मार्गदर्शन केले जाते.