

MPDFA संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दूध व्यावसायिक व शेतकरी बांधवांनी या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. दूध उत्पादनातील इतर समस्या सोडविण्यासाठी आणि सार्वत्रिक व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने MPDFA ची निर्मिती झाली आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दति आणि योजनांच्या माध्यमातून दूध व्यवसायात सक्रीय व्हावे, गायींच्या संगोपनातील पारंपारिक दॄष्टिकोन बदलून व्यवसायाभिमुख पशुपालन करावे; जेणेकरून महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक विवंचनेतून बाहेर पडू शकतात. देशातील एकूण रोजगारापैकी ९ टक्के रोजगारनिर्मिती दूध व्यवसायातून होते. रोजगारातील ही संधी अधिक वाढवून शेतकरी कुटुंबातील युवक, महिला व पर्यायाने राज्यातील ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी MPDFA प्रयत्नशील आहे.

पशुपालनास अधिक चालना देऊन देशी जनावरांची गुणात्मक व अनुवंशिक सुधारणा करणे.
कृषिविषयक विविध माहितीपुस्तिका, मासिके, पाक्षिके इत्यादींची निर्मिती करणे.
निरोगी व जातिवंत दुधाळ गायी वाढवून गायींच्या देशी वाणांची जपणूक करणे.
पारंपारिक दूध व्यवसायास आधुनिकीकरणातून मुख्य व्यवसायाचे स्वरुप देणे.
शाश्वत शेतीच्या विकासासाठी उत्कृष्ट सेंद्रिय शेणखताची निर्मिती करणे.
ग्रामीण भागात पशुपालनाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे.
तरुणांसाठी शिक्षण व नोकरीसह दुग्ध व्यवसायाची दिशा दर्शविणे.
युवा उत्पादकांना प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागात रोजगार वाढविणे.

